करिअरनामा ऑनलाईन । UGC-NET च्या अभ्यासक्रमात (UGC NET Syllabus) काही बदल केले जाणार आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 मधील बदलानंतर आता या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे.
युजीसी (UGC) लवकरच विविध विषयांतील अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असून, नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर त्यापूर्वी उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. पुढील महिन्यात UGC-NET परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर 2024 मध्ये UGC-NETचे पहिले सत्र 10 ते 21 जूनदरम्यान होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीनंतर (UGC NET Syllabus) बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि समग्र शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलांच्या अनुषंगाने UGC-NETचा अभ्यासक्रमही अद्ययावत केला जाईल, असा निर्णय यूजीसी आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC-NET च्या अभ्यासक्रमातही बदल केले जाणार आहेत. यूजीसी आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com