करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र शिक्षक (TET Exam) पात्रता परीक्षेचा म्हणजेच Maha TET exam 2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर कारणात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण राज्यभरातून या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसले होते. तरीही राज्याचा निकाल अवघे 3.70% इतका लागला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. त्यापैकी पहिली ते पाचवी पेपर पहिला आणि सहावी ते आठवी पेपर दुसरा याचा निकाल (TET Exam) परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. मात्र या दोन्ही पेपरमध्ये लाखो उमेदवारांपैकी काहीच उमेदवार पास होऊ शकले आहेत.
अशी आहे निकालाची आकडेवारी (TET Exam)
पहिल्या पेपरसाठी दोन लाख 54 हजार 428 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 967 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दुसऱ्या पेपरसाठी गणित विज्ञान सहावी ते आठवी 64 हजार 647 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 937 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पेपर दुसरा सामाजिक शास्त्र सहावी ते आठवी विद्यार्थी एक लाख 49 हजार 604 उमेदवार बसले होते. त्यापैकी सहा हजार सातशे अकरा उमेदवार पास झाले आहेत. (TET Exam)
संपूर्ण राज्यभरातून TET परीक्षेसाठी 4 लाख 68 हजार 679 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अवघे 17,322 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण निकाल 3.70% इतका लागला आहे.
MPSC मार्फत होणार भरती?
राज्यातील शिक्षक भरती MPSCच्या माध्यमातून व्हावी, असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे. MPSC चे शिक्षण सचिवही या प्रस्तावाबाबत सकारात्मक (TET Exam) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. MPSC मार्फत भरती प्रक्रिया करण्यासाठी नियमांमध्येही काही तांत्रिक बदल करण्याची गरज आहे.
नियम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण केली जाईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांधरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षक भरती होणार आहे, ती शिक्षक भरती MPSCच्या माध्यमातून घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल. सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीची मागणी वारंवार केली जात आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी पवित्र (TET Exam) पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू असताना अनेक तांत्रिक अडचणींमुळे भरती प्रक्रिया लांबली. त्यामुळे एमपीएससी सारख्या अनुभवी संस्थेमार्फत कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जात आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com