Technology News : APPLE कर्मचाऱ्यांना ChatGpt वापरता येणार नाही; काय आहे नेमकं कारण?

Technology News
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ChatGPT हे इंटरनेटवर उपलब्ध (Technology News) असलेल्या सर्वात स्मार्ट AI पैकी एक मानले जाते. आता यालाच टक्कर देण्यासाठी गूगलचे AI Bard देखील आले आहे. कंपन्या AI चॅटबॉट वापरत असतील तर ते चांगले आहे. सोबतच याचे काही नुकसानसुद्धा सांगण्यात आले आहे. सध्या अॅपलबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. असे वृत्त आहे की अॅपलचे कर्मचारी ChatGPT किंवा इतर कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित साधने वापरु शकत नाहीत. आता प्रश्न असा आहे हे कर्मचारी ChatGPT का वापरु शकत नाहीत?
ChatGPT तुम्हाला सर्व भाषा, मॉडेल प्रश्नांची उत्तरे देऊ शकते आणि तसेच ईमेल, निबंध आणि कोड तयार करणे यासारख्या कार्यांमध्ये तुम्हाला मदत करू शकते. मात्र आता याच ChatGPT चा वापर अॅपलच्या कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. तसे आदेशच कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे कंपनीने कठोर आदेश दिले ते पाहूया…

काय आहे नेमकं कारण
Apple तंतोतंत AI सारखी टेक्नोलॉजी तयार करत आहे. अशा परिस्थितीत कंपनीला अशी भीती आहे की, कर्मचार्‍यांनी
स्वतःच्या उत्पादनाबद्दलची त्यांची गोपनीय माहिती शेअर (Technology News) करू नये. डब्ल्यूएसजेच्या रिपोर्टवरून हे देखील समोर आले आहे की, अॅपलने कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. तसेच प्रोप्रायटरी GitHub चे Copilot वापरण्यास सांगितले आहे, जे आपोआप सॉफ्टवेअर कोड जनरेट करते.

Appleची सावधगिरी (Technology News)
अॅपल कंपनीकडून इतकी सावधानगिरी बाळण्याचं कारण म्हणजे जेव्हा लोक हे AI मॉडेल्स वापरतात तेव्हा विचारलेल्या प्रश्नांचा डेटा डेव्हलपर्स AI सुधारण्यासाठी वापरू शकतात. ज्यामुळे तो डेटा परत पाठवला जातो. यामुळे अनावधानाने वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती शेअर होण्याचा (Technology News) धोका निर्माण होतो. मार्च महिन्यात ChatGPT मध्ये देखील एक त्रुटी आढळली होती. या त्रुटीचे कारण म्हणजे एका यूजरची चॅट हिस्ट्री दुसऱ्या यूजरला दाखवली जात होती. असं असलं तरीही Open AI नंतर एक फीचर सुरू केले जे AI वापरकर्त्यांच्या डेटावर कार्य करण्यास अनुमती देते. जे मॉडेलला प्रशिक्षित होण्यापासून प्रतिबंधित करते. बर्‍याच संस्था आधीच ChatGPT बद्दल सावध झाल्या आहेत. कारण त्यांचे कर्मचारी ईमेल लिहिणे, मार्केटिंग कंटेंट तयार करणे आणि सॉफ्टवेअर कोडिंग यासारख्या कामांमध्ये विविध कारणांसाठी याचा वापर करतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com