मराठी शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडन्ट प्राइझ अकॅडमी’वर सदस्य म्हणून नेमणूक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एक शिक्षकाला शिक्षण व्यवस्थेमधील कणा म्हटले तरी हरकत नाही. असेच काही शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या आणि बुद्धीच्या कोऱ्या पाटीवर लिहीत असतात. यातून तो विद्यार्थी घडतो. रणजितसिंह डीसले हे असेच एक अफलातून शिक्षक! सोलापूरमधील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आपली सेवा देतात. जेव्हा ते शिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हा त्यांना कळले की एक शिक्षक म्हणून ते खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. मग त्यांनी परितेवाडी येथील आदिवासी मुलांसाठी काम करणे सुरू केले. आणि ही स्टोरी BBC न्युज ने टीचर्स डे ला प्रकाशित केली.

आणि त्यांच्या ह्या मेहनतीचा परिणाम म्हणून त्यांना ‘गोल्डन स्टुडन्ट प्राइझ’ हा पुरस्कार देण्यात आला. 1 अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार. आता ह्याच पुरस्काराशी साम्य असणारा 50 हजार अमेरिकी डॉलर पुरस्काराच्या निवड समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या सोबतीने वार्क फौंडेशन ने हा पुरस्कार सुरू केला आहे. चेग ही ना-नफा या तत्वावर काम करणारी शिक्षण क्षेत्रातील कंपनी आहे.

एकूणच समाजावर आपला ठसा उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ग्लोबल स्टुडन्ट प्राइझ सुरू करण्यात आले. आता रणजितसिंह डीसले यांच्या सोबतच अभिनेते अ‍ॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत. “विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असते. ती क्षमता बाहेर आणण्यासाठी ग्लोबल स्टुडन्ट प्राइझ एक योग्य व्यासपीठ आहे आणि या समितीवर निवड झाल्याचा मला अभिमान असून अश्या प्रेरणादायक उद्देशाला माझा पाठिंबा आहे.” अशी प्रतिक्रिया रणजितसिंह दिसले यांनी करिअरनामाला दिली.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group: https://chat.whatsapp.com/CCWOk9AmW9P4O7UpdSpIoe

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com/