बेरोजगारांसाठी खुशखबर! कोरोना संकटात ‘या’ मोठ्या कंपनीत ४० हजार जागांसाठी बंपर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ४० हजार लोकांना भरती करून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देण्याची योजना तयार केली आहे. टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा उद्देश एच-१बी आणि एल-१ वर्क व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्याचा आहे.

अमेरिकेतील एच-१ बी आणि एल-१ वर्क व्हिसा मिळवणे गेल्या काही दिवसांपासून अवघड होत चालले आहे. कोरोनामुळे जून महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यानंतर देखील कंपनीने ४० हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, ‘नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजाराच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल. कंपनीला अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहा महिन्यात व्यवसाय पुन्हा रूळावर येईल. टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या १० बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे.’

या कंपनीने  २०१४ पासून २० हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे. टीसीएसने गेल्या वर्षी ४० हजार जणांची कॅम्पस भरती केली होती. हे फ्रेशर जुलैच्या मध्यापर्यंत कंपनीत काम सुरू करतील. यातील ८७ टक्के आधीपासूनच लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. ८ हजार ते १० हजार जणांना प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन काम दिले जाते. भरती झालेल्यापैकी ८ हजारहून अधिक लोकांनी एक किंवा दोन डिजिटल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com