Talathi Bharti 2022 : तलाठी भरतीचा मार्ग मोकळा!! मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; जाणून घ्या परिक्षा पध्दती, अभ्यासक्रम आणि रिक्त पदे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या रिक्त (Talathi Bharti 2022) पदांमुळे महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात तलाठ्यांची एकूण 3,165 पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 1012 तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर (Talathi Bharti 2022) वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तलाठी गट ‘क’ संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण 1012 रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे.

या संदर्भात जून महिना अखेरीस तलाठी भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. रिक्त पदांचा तपशील आणि माहिती खाली दिलेली आहे. पूर्ण जाहिरात आणि अपडेट्स लवकरच प्रसिध्द केले जातील.

जिल्हानिहाय रिक्त पदे –

मुंबई उपनगर – 15 पदे
अकोला – 49 पदे
रायगड – 51 पदे
नागपूर – 50 पदे
यवतमाळ – 62 पदे
गडचिरोली – 28 पदे
हिंगोली- 25 पदे
धुळे – 50 पदे
जळगाव – 99 पदे
अहमदनगर – 84 पदे
उस्मानाबाद – 45 पदे
औरंगाबाद – 56 पदे
नंदुरबार – 44 पदे
लातूर – 29 पदे
भंडारा – 22 पदे
नाशिक – 83 पदे
सिंधुदुर्ग – 42 पदे
गोंदिया – 29 पदे
चंद्रपूर – 43 पदे
सांगली – 45 पदे
ठाणे – 23 पदे
सोलापूर – 84 पदे
बुलढाणा – 49 पदे
वाशिम – 22 पदे
वर्धा – 44 पदे
रत्नागिरी – 94 पदे
पुणे – 89 पदे
अमरावती – 79 पदे
बीड – 66 पदे
जालना – 28 पदे
नांदेड – 62 पदे
कोल्हापूर – 67 पदे
सातारा – 114 पदे
परभणी – 27 पदे

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप (Talathi Bharti 2022)

अ. क्र.  विषय    प्रश्नांची संख्या    गुण

1      मराठी भाषा     25             50
2      इंग्रजी भाषा      25             50
3      सामान्य ज्ञान     25             50
4     बौद्धिक चाचणी  25             50
एकूण            100           200

  • महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम –

1 English Grammar –

(Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2 मराठी व्‍याकरण –

(वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3 सामान्य ज्ञान –

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक (Talathi Bharti 2022)

4 बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता –

(कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

परीक्षेचा दर्जा –

  1. प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) दर्जाच्या समान.
  2. बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जा सामान.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com