जेईई परीक्षार्थीच्या मदतीसाठी ‘आयआयटी’चे विद्यार्थी सरसावले
सद्य:स्थितीत वाहतुकीच्या साधनांची अनुपलब्धता आणि दूरवरचे परीक्षा केंद्र यामुळे परीक्षेला वेळेवर कसे पोहोचायचे, अशा पेचात असलेल्या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या (जेईई) परीक्षार्थीच्या मदतीला आयआयटी मुंबईचे देशभरात विखुरलेले आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत.