साडे आठ लाख विद्यार्थ्यांची ‘जेईई मेन्स’साठी नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन । देशपातळीवरील पहिली जेईई मेन्स  परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर राेजी होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील 8 लाख 58 हजार 273 विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. 6 लाख 49 हजार 223 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहे.या विद्यार्थ्यांनी कराेनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

देशभरात विविध शहरांमधील वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. एनटीएकडून जेईई मेन्स  2020 चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी माेड) हाेणार आहे.

बीटेक/ बीई आणि बीआर्कसाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा होतील. बीटेक / बीईसाठी देशभरात 605 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्क व बीप्लॅनिंगसाठी देशातील विविध शहरांमध्ये 489 परीक्षा केंद्रे आहेत. भारतात एकूण 224 शहरांमध्ये आणि परदेशातील 8 शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती एनटीएने दिली आहे.

अभ्यासक्रमानुसार परीक्षार्थींची संख्या – 

बी. ई., बी. टेक- 746115

बी. आर्क. -13609

बी. प्लॅनिंग-  699

बी. ई/बी. टेक व बी. आर्क. (दाेन्ही) – 53520

बी. ई/बी. टेक व बी प्लॅनिंग (दाेन्ही)- 5580

बी. आर्क आणि बी. प्लॅनिंग(दाेन्ही) –  2777

बी. ई/बी. टेक, बी. आर्क आणि बी प्लॅनिंग (सर्व) – 35973

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com