Swadhar Yojana 2023 : महाराष्ट्र शासनाची ‘स्वाधार योजना’ जाहीर; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक लाभ; अर्ज सुरु

Swadhar Yojana 2023
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (Swadhar Yojana 2023) विभागामार्फत होतकरु विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविण्यात येत आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले स्वाधार अर्ज https://swadhar.acswpune.com या संकेतस्थळावर भरून आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत इयत्ता 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमांना, तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2016 -2017 पासून ही योजना लागू केली आहे.

पुणे जिल्हा, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका या हद्दीत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून दिलेल्या मुदतीत (Swadhar Yojana 2023) ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घ्यावेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या कार्यालयात सादर करायचे आहेत. अर्जाचा नमुना तसेच अर्ज सादर करावयाची नियमावली स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल. महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.

योजनेअंतर्गत मिळणारे फायदे (Swadhar Yojana 2023)
1. स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे अशा गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
2. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना रीतसर अर्ज करावा लागेल.
3. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’चा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
4. लाभार्थी विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर खर्चासाठी सरकारकडून प्रतिवर्षी 51,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
5. स्वाधार योजनेअंतर्गत, तुम्ही इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये अभ्यास सुरू ठेवण्यासाठी अर्ज करू शकता तसेच
तुम्ही डिप्लोमा व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास पात्र असाल.

आवश्यक कागदपत्रे –
1. जाती प्रमाण पत्र
2. आधार कार्ड
3. ओळखीचा पुरावा
4. अधिवास प्रमाण पत्र (Swadhar Yojana 2023)
5. पासपोर्ट साइज फोटो
6. 10वी/12वी गुण पत्रिका
7. बँक पासबुक फोटोकॉपी (केवल राष्ट्रीयकृत बैंक)
8. कॉलेज सर्टिफिकेट
9. महाविद्यालयाचे शाळेतील उपस्थिती प्रमाणपत्र
10. आधार लिंक बँक खाते क्रमांक
11. शपथ पत्र
अर्ज करण्यासाठी आणि योजनेविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी https://swadhar.acswpune.com/ही लिंक वापरा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com