‘या’ अभिनेत्रीचा जिम मधील भन्नाट डान्स पाहून तुम्ही यंदाच्या वर्षी तरी नक्किच जिम जाॅईन कराल!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई | सुश्मिता सेन नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. नुकताच सुश्मिताने जिम मध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. असा डान्स करा की जणू तुम्हाला कोणीही पाहत नाहिये असं कॅप्शन यावेळी सुश्मिताने दिले आहे. सुश्मिताचा फिटनेस पाहून आणि तिने दिलेले कॅप्शन पाहून तुम्ही यंदाच्या वर्षीतरी जिम जाॅईन करण्याचा नक्की विचार कराल.

आयुष्यातील कोणत्याही शिस्तीच्या बाबतीत सुसंगत राहणे फार अवघड काम आहे. तसेच नेहमी प्रेरणादायी, आशादायी राहणेसुद्धा अवघड गोष्ट आहे. त्यामुळेच जेव्हा माझ्या मुलांची गोष्ट येते मी त्यांना याच बाबी खेळातून देण्याचा प्रयत्न करते असं सुश्मिताने म्हटलं आहे.

आयुष्य हे प्रत्तेकासाठी गाण्याची वेगळी प्लॅलिस्ट आहे. तुम्ही तुमची रिदम निवडणुन हालचाल करण्यास सुरवात करा बाकी सगळं नॅचरली होऊन जाईल असं म्हणत सुश्मिताने आयुष्याचा फंडा यावेळी सांगितला आहे.