असे सकारात्मक विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत… जे प्रत्येकाला ज्ञान प्रकाशित करत असतात.

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । कधी कधी मनुष्याला संकटातून बाहेर येण्यासाठी सकारात्मक गोष्टींची गरज भासते. कारण हेच सकारात्मक विचार जे मनुष्याला नेहमी ज्ञान प्रकाशित करत असतात.
सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते.

>नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा.

>आपल्या यशाची पद्धत आपण स्वतः शोधली पाहिजे. वाट आपोआप तयार होत असते.

> प्रत्येक गोष्टीला स्वीकारा, अडचणी नक्की येणार , पण त्यावर मात करने हे आपल्या हातात आहे. ह्या सर्व प्रवासात तुम्हाला नकारात्मक लोकही भेटतील, त्यांना एक ‘स्माईल’ दया, त्यांच्याशी कृतीतून बोला आणि आपल्या कामाला लागा.

>”कष्ट ही एक प्रेरक शक्ती आहे. ती माणसाची क्षमता तपासते.”

>यश-अपयशाचे अनुभव हे जीवन समृद्ध करण्यासाठीच आहेत. ते आपण किती सकारात्मकतेने घेतोे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.

>अनेकवेळा आपले यश अपयश हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते, त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा.

>नकारात्मक विचार आणि विशेषतः नकारात्मक लोक यांच्यापासून सदैव दुरच रहा.

>बऱ्याचदा ह्या गोष्टी स्वतःच्या प्रामाणिक पणावर अवलंबून असतात. आपण जेवढे आपल्या कामाशी व आजुबाजुच्या व्यवस्थेशी प्रामाणिक राहतो तेवढे आपण यशाच्या व मानसिक स्वास्थाच्या जवळ असतो.

जीवन जगण्याची कला…

>एक छान सुविचार आहे,
‘स्वतःशी प्रामाणिक राहा म्हणजे जग आपोआपच तुमच्याशी प्रामाणिक राहील’.

>’थेंबे थेंबे तळे साचे….’ यावरून आपण शक्य होईल तेवढे आपल्या ध्येयाच्या जवळ गेले पाहिजे.

>गत वर्षात काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील तर हे येणारे वर्ष त्यासाठीच आहे, हे पाहून संकल्प करा.

>जर तुम्ही आतापर्यंत काही बाबतीत अपयशी ठरला असाल तर एका शायराचे हे बोल नेहमी लक्षात ठेवा……
“इक ख्वाब टूट गया तो क्या कुछ हुवा..?
जिंदगी ख्वाबों की सौगात है……
नींद ही अपनी,खयाल ही अपने है!”
( एक स्वप्न तुटल तर काय मोठ बिघडल, आयुष्य म्हणजे स्वप्नांचीच मालिका आहे, झोपही आपली आणि विचारही आपलेच आहेत.)


ताज्या घडामोडीसाठी आमच्या  https://careernama.com/ला भेट देत रहा.


करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

☎ +91 8806336033 , +91 9403839394

✉ [email protected]