करिअरनामा ऑनलाईन । ही प्रेरणादायी कहाणी एका महिलेची (Success Story) आहे जिने बुरख्याचे बंधन तोडून बंदूक हाती घेतली आणि जंगल माफियांपासून जंगलांचे रक्षण केले. ही धाडसी महिला उदयपूरची (राजस्थान) आहे. तिचं नाव आहे संतोष भाटी. त्यांचे जीवन खडतर संघर्ष आणि असंख्य चढ-उतारांनी भरलेले होते, आयुष्यात प्रत्येक पायरीवर काटेच होते. पण संतोष यांनी हार मानली नाही. अपयशाने हिंमत हारणाऱ्या सर्वांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरणार आहे. संतोष यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा….
पदरात तीन मुली आणि पतीचं निधन
संतोष भाटी ही ती निरागस मुलगी जिचे बालपणीच लग्न झाले होते. लग्नानंतर तिला तीन मुली झाल्या आणि अवघ्या 21 व्या वर्षी पतीचे निधन झाले. आयुष्याच्या खडतर प्रवासाला सुरवात झाली होती आणि पदरात तीन निष्पाप मुली होत्या. पण संतोष यांच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. त्यांनी न खचता आपल्या मुलींसह आयुष्याच्या वाटेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
मुलींना सांभाळत केला अभ्यास (Success Story)
संतोष सांगतात; “मी 14 वर्षांची असताना माझे लग्न झाले. मला तीन मुली झाल्या. तीन मुलींचा सांभाळ करत संसार पती सोबत सुखी संसार सुरू असतानाच अचानक एक वादळ आलं. माझ्या पतीचे अचानक निधन झाले. ते हे जग सोडून गेले. यानंतर मुलींची सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर आली. ती स्वतःसाठी आणि मुलींच्या उदरनिर्वाहासाठी उदयपूरला आले. मात्र शिक्षणाअभावी काम मिळणे कठीण झाले होते. मग मी लोकांची घरे झाडून साफसफाईची कामे करायला सुरूवात केली. त्यादरम्यान मी योगायोगाने एका एनजीओच्या संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यास सुरू केला. मी इतर विद्यार्थ्यांपेक्षा वयाने मोठी दिसत असल्याने आठवीच्या (Success Story) परीक्षेला गेले तेव्हा मुलांनी माझी चेष्टा केली. संकोचामुळे मी परीक्षेच्या गेटवरूनच परत आले. मात्र काही लोकांनी माझी समजूत घातली आणि मी पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. अशापद्धतीने मी 8 वी पास झाले. यानंतर माझ्यामध्ये उत्साह आला आणि मी मुलींचा सांभाळ करत 10वी आणि 12वीची परीक्षा दिली.”
बी.ए. पूर्ण केल्यानंतर पास केली वनरक्षक भरती परीक्षा
नोकरी मिळवण्यासाठी मी शिक्षण घेतलं. पण 12 वी पर्यंतचे शिक्षण पुरेसं नव्हतं. मी पुढे जावून पदवी शिक्षण घेतलं. जेव्हा मी बी. ए. ची अंतिम परीक्षा देत होते, त्यावेळी वन रक्षक भरतीची (Success Story) जागा निघाली होती. मी या परीक्षेचा फॉर्म भरला आणि परीक्षा पास झाले. जेव्हा मी 2016 मध्ये पदावर रुजू झाले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की मला तीच सरकारी नोकरी मिळाली आहे, ज्याचा मी स्वप्नातही कधी विचार केला नाही.”
पतीच्या मृत्यूनंतर 3 मुलींचा सांभाळ करत संतोष यांनी सरकारी परीक्षा देवून कायमची नोकरी मिळवली आहे. त्यांच्यातील जिद्द नवीन पिढी, आणि महिलांसाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे. संतोष या सध्या वन रक्षक विभागात त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com