Career Success Story : जे ठरवलं ते केलंच!! टेम्पोचालकाच्या मुलाने पोलंडमध्ये मिळवली नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | परदेशात नोकरी करणे म्हणजे भारतात अभिमानाची गोष्ट समजली जाते. (Success story of Sachin Ghayal) त्यामुळे परदेशी नोकरीला जाण्याची ओढ अनेकांना असते. परिस्थितीअभावी अनेकांचे स्वप्न ते स्वप्नच राहते. पण या सगळ्या समस्यांवर मात करत स्वप्न साकराण्याची किमया नाशिक जिल्ह्यातील विष्णूनगर येथील टेम्पोचालकाच्या मुलाने करून दाखविली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशात नोकरीसाठी तो गेला असून गावासह परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचं नाव आहे सचिन रोहिदास घायाळ. सचिन हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याची जिद्द तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जाणून घेवूया त्याच्या जिद्दीविषयी…

विष्णूनगर येथील रोहिदास घायाळ यांनी संपूर्ण आयुष्यभर टेम्पोचालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. तर त्यांची पत्नी शोभा यांनी शेतात मजुरी करुन रोहिदास यांना हातभार लावला. दोघांनी मुलांचे डिप्लोमा पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा देशसेवेसाठी आर्मीत भरती झाला. तर लहान मुलगा सचिनचे Mechanical Engineering चे शिक्षण पूर्ण झाले होते. घरची परिस्थितीती हलाखीची असल्याने सचिनने नाशिक येथे एका खासगी कंपनीत काम करत पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने राष्ट्रीय स्तरावरील डिझाइन कोर्सचे शिक्षण घेतले. शिकण्याची जिद्द आणि परदेशी जाण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

विष्णूनगर येथील विकास शिंदे हा मुलगा पोलंड येथे नोकरीसाठी आहे. सचिन परदेशात जाण्यासाठी वेळोवेळी त्याच्याकडून मार्गदर्शन घेत असे. त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरू होती. अखेर सचिनच्या प्रयत्नांना यश आले (Success story of Sachin Ghayal) आणि पोलंड येथील ‘इ सेल प्रोपॅक लि.’ या नामांकित कंपनीत त्याची गुणवत्तेवर निवड झाली आणि सचिनचे परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न सत्यात अवतरले. सचिन सध्या पोलंडमध्ये ‘इ सेल प्रोपॅक लि.’ कंपनीत आपली जबाबदारी पार पाडत आहे.

सचिनने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना त्याचे वडील म्हणतात; “आमची हालाखीची परिस्थितीती असतानाही सचिनने इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःची जिद्द पूर्ण केली. यामध्ये त्याला विकासचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तो स्वप्न साकारू शकला. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. इतर मुलांनी सचिनची प्रेरणा घ्यावी.” असं ते सांगतात. (Success story of Sachin Ghayal)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com