करिअरनामा ऑनलाईन | अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच ते भविष्यात काय करणार आहेत आणि त्यांना काय आवडते याची जाणीव होते. आणि ते लहानपणापासूनच ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. भारतीय सैनिक दलामध्ये अधिकारी म्हणून जायचे असेल तर, खूप लवकर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी समजणे गरजेचे असते. त्यानुसार कठोर परिश्रम घेऊन ते सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ शकतात. असाच एक मराठी मुलगा कठोर परिश्रमानंतर सैन्यदलामध्ये अधिकारी म्हणून रुजू झाला आहे. त्यांचे नाव मुकुल इंगळे. त्यांच्या कठोर प्रवासाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बारामती मधील कोराळे बुद्रुक येथील रहिवासी असलेले मुकुल इंगळे यांनी खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीची प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर त्यांचे सिलेक्शन झाले. तीन वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रुजू झाले. तीन वर्षाचे कठोर परीक्षण कार्यक्रम झाल्यानंतर, ते देहरादून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमिमध्ये एक वर्षाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण केला. काही दिवसापूर्वी दीक्षांत समारंभ पार पडला. त्यानंतर मुकुंद यांची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 148 व्या तुकडीमध्ये भारतामधील 341 सर मित्रराष्ट्रातील 84 विद्यार्थ्यांना पदवी मिळाली.
बारामती येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर मुकुल यांनी औरंगाबाद येथील सर्विसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूटमध्ये अकरावी- बारावी पूर्ण केली. त्यानंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला येथे तीन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे एक वर्षाचा कठोर परिश्रमाचा कोर्स पूर्ण केला. व 148 व्या तुकडीमध्ये ते उत्तीर्ण होऊन सैन्यदलामध्ये लेफ्टनंटपदी भरती झाले आहेत. कमी वयामध्ये केलेल्या या मोठ्या कामगिरीसाठी समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com