करिअरनामा ऑनलाईन । झारखंडचे अभिषेक कुमार हे अशा विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण आहे जे अडचणींना घाबरतात. अभिषेक यांचा यूपीएससी परीक्षेचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि प्रत्येक अडचणीसोबत लढा दिला. अभिषेक यांनी कठोर परिश्रम आणि समर्पणाने आयआयटी ते आयएएस पर्यंत एक कठीण प्रवास केला. जोपर्यंत त्यांनी आपल्या पसंतीची रँक मिळविली नाही तोपर्यंत अभिषेक प्रयत्न करत राहिले. चला तर मग त्यांच्या कठीण आणि आव्हानात्मक प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
अभिषेक यांनी 2014 साली पहिला अटेम्पट दिला, ज्यामध्ये त्यांची प्री देखील क्लियर झाली नव्हती. त्यावेळी ते नोकरी करत होते. यानंतर, पुढच्या वर्षी त्यांनी परिक्षा दिली नाही. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तयारीनंतर पुन्हा परीक्षा दिली. सन 2017 मध्ये त्यांची निवड झाली. परंतु त्यांची रँक 133 होती, ज्यामुळे त्यांना भारतीय महसूल सेवा मिळाली. यानंतरही त्यांनी प्रयत्न केला आणि सन 2018 मध्ये, त्यांची रँक मागील वर्षाच्या तुलनेत खराब झाली. त्यांनी 243 व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अभिषेक हे सलग तीन वर्षे गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी झाले. 2019 मध्ये पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांनी टॉपर्सच्या यादीत स्थान मिळविले. अभिषेक यांनी इतक्या वर्षात कधीही हार मानली नाही किंवा परीक्षेच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नाही.
अभिषेक सांगतात की, प्रत्येकाने स्वतःची रणनीती स्वतःच बनली पाहिजे. दुसर्याच्या रणनीतीला कधीही डोळे लावून आत्मसात करू नका. सर्व विषयांची एनसीईआरटीची पुस्तके तसेच चालू घडामोडींसाठी वृत्तपत्रे वाचा. मॉक टेस्ट द्या चुका दुरुस्त करा. नेहमीच यूपीएससीचा अभ्यासक्रम लक्षात ठेवा आणि त्यानुसार नोट्स बनवा. नोट्स बनविल्यामुळे रिवाईज करणे सोपे जाते. अभिषेक इतर उमेदवारांना त्यांच्या क्षमता आणि गरजा या नुसार अभ्यास करण्याचा सल्ला देतात. उत्तर लेखन आणि पुनरावृत्तीकडे लक्ष द्या, कारण ते फार महत्वाचे आहे. सुरुवातीला, फक्त चांगली उत्तरे लिहिण्यावर लक्ष द्या, वेगाची चिंता करू नका. निबंध आणि नीतिशास्त्र च्या पेपरला समान महत्त्व द्या. जोरदार सराव करा. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, म्हणून परिश्रम करा’.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com