करिअरनामा । विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयआयटी मुंबईने पवई कॅम्पसमधील सर्व विद्यार्थ्यांना 20 मार्चच्या आत वसतिगृहे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांची एक तातडीची बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
“मुंबई महानगरपालिका आणि अन्य प्रशासकीय आदेशांनुसार, शैक्षणिक संस्था 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेतील डिपार्टमेंट्स, ग्रंथालये आदि सेवांचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येणार नाही. या कालावधीत होस्टेलच्या मेसची सेवाही विस्कळीत असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वसतिगृहे रिकामी करावीत” असे IIT मुंबईचे संचालक सुभासिस चौधरी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
20 मार्चनंतर कोणालाही संस्थेच्या गेटमधून आत वा बाहेर सोडण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना शुक्रवारी 20 मार्च रात्रीपर्यंत वसतिगृहे रिकामी करायचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अभ्यासक्रमाविषयीच्या सूचना लवकरच देण्यात येतील. या सत्राचा अभ्यासक्रम ऑनलाइन घेण्यात येणार आहे, असेही संचालकांनी कळवले आहे.
अधिक माहितीसाठी – www.careernama.com या लिंकवर क्लिक करा आणि नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘HelloJob’