करिअरनामा ऑनलाईन । माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (StartUp India) अंतर्गत सुरू असलेल्या एमआयटी टेक्नॉलॉजी बिजनेस इनक्युबेशन सेंटर (MIT TBI) तर्फे नव उद्योजकांना स्टार्टअप प्रशिक्षण, मार्गदर्शन व अर्थ सहाय्य अनुदान मिळवून देण्यासाठी पुढे सरसावले आहे. तरुणांनी आपल्या नवकल्पना उद्योगांमध्ये रुपांतरित कराव्या; असे आवाहन एमआयटी संस्थेचे संस्थापक व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
ते पुढे म्हणाले माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, कृषी तंत्रज्ञान, जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, वैद्यकीय तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी इत्यादी क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य व मार्गदर्शन केले जाते. आजच्या घडीला 37 स्टार्टअप (StartUp India) कंपन्या MIT TBIमध्ये आपापली उत्पादने व सेवा विकसित करत आहेत.
कोणत्याही स्टार्टअपला आपली कल्पना विकसित करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज भासते. यासाठी विविध सरकारी व खासगी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया अंतर्गत स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम (Startup India Seed Fund Scheme) उपक्रमाअंतर्गत एमआयटी टीबीआय एकूण तीन कोटी रूपयांचे सहाय्य देईल. यामध्ये 10 लाख रूपयांपर्यंत अनुदान तसेच 30 लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद असेल. कॉर्पोरेट (StartUp India) सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजनेअंतर्गत विविध कंपन्यांकडून स्टार्टअपना आर्थिक सहाय्य व अनुदान मिळवून देण्यासाठी एमआयटी टीबीआय प्रयत्नशील असेल.
वर्ष २०१७ पासून कार्यरत असलेली एमआयटी टीबीआय महाराष्ट्रातील अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. या सेंटरला २०१८ साली केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी संस्थेची मान्यता मिळाली आहे. तसेच एमआयटी टीबीआयच्या इन्क्युबेशन सेंटर विकसित करण्यासाठी व इतर सुविधा बनविण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील केले आहे. देशात प्रथमच एका खाजगी विद्यापीठाच्या अशा सेंटरला केंद्र सरकार कडून सहाय्य मिळाले आहे.
एमआयटीच्या कोथरूड परिसरात टीबीआय सेंटर 11 हजार स्क्वेअर फूटात विस्तारीत आहे. यामध्ये को-वर्किंग कार्यालय, फॅब लॅब, विविध प्रयोगशाळा, टेस्टिंग सेंटर इत्यादी सुविधा विकसित केल्या आहेत. तसेच शहरातील यशस्वी उद्योजकांकडून स्टार्टअपना विनामूल्य (StartUp India) मार्गदर्शन केले जाते. एमआयटी टीबीआयतर्फे आजपर्यंत 50 पेक्षा अधिक विद्यार्थी व नव उद्योजकांना त्यांच्या स्टार्टअपसाठी विविध प्रकारचे सहाय्य देण्यात आले आहे. या मध्ये सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत स्टार्टअपचा समावेश आहे.
प्रा. प्रकाश जोशी यांनी सांगितले की, पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी व इतर तरूणांनी नोकरी शोधण्याच्या मागे न लागता आपल्या नव कल्पनांना विकसित करून त्याचे रुपांतर यशस्वी कंपनीत करावे. स्वतः उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. या उद्देशाने एमआयटी (StartUp India) टीबीआयची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील ६ महिन्यांमध्ये जवळपास ५० स्टार्टअप कंपन्यांना सहाय्य देण्याचा आमचा संकल्प आहे.
या संंदर्भात अधिक माहितीसाठी www.mittbi.org या वेबसाईटला भेट द्यावी व [email protected] येथे ईमेल पाठवावा; असे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com