करिअरनामा ऑनलाईन । मराठा/कुणबी समाजातील युवकांसाठी (Start Up) उद्योजक होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. ‘सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमा’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरीत करण्यासाठी अर्थ सहाय्य केले जाणार आहे. राज्यातील विविध इनक्युबेशन केंद्रांमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनसाठी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
आता इच्छुक तरुण ३० एप्रिल पर्यंत या (Start Up) योजनेसाठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा किंवा कुणबी गटातील नवउद्योजकांची ही निवड एका वर्षासाठी करण्यात येते.
इथे करा अर्ज – https://sarthi-maharashtragov.in/
अर्ज करण्यासाठी मुदत – 30 एप्रिल 2024
काय आहे आवश्यक पात्रता – (Start Up)
1. इच्छुक विद्यार्थी किमान पदवीधर असावा.
2. विद्यार्थ्यांकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी.
3. एका वर्षामध्ये त्याने कल्पनेचे रूपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे
4. आर्थिक साहाय्य दिलेल्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्ण वेळ पाठपुरावा करणे आवश्यक आहे
इनक्युबेशन केंद्राचे नाव आणि उपलब्ध जागा –
1. एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे – १० जागा
2. उद्यम सोलापुर विद्यापीठ (Start Up) इनक्युबेशन सेंटर, सोलापूर – १० जागा
3. शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजेस, कोल्हापूर – १० जागा
4. मराठवाडा एक्सलरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इनक्युबेशन कॉंन्सिल, छत्रपती संभाजीनगर – १० जागा
5. नेत्ररित फाउंडेशन, सांगली – १० जागा
6. जी. एच. रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर फाउंडेशन, नागपूर – १० जागा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com