मुंबई | “औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या १५ दुष्काळग्रस्त घोषित जिल्ह्यांमध्ये होणार चालक आणि वाहकांच्या ४२४२ पदांची भरती होणार आहे ,” अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे .
श्री . रावते यांनी सांगितले ,”या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत दिली जाईल . लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल . इतर आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणाचीही या भरतीत अंमलबजावणी होणार आहे .”
श्री . रावते यांनी सांगितले की ,” भरतीतील उत्तीर्ण पात्र उमेदवारांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे . ”
WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group
आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram