SSC Results 2023 : पाहिजे होते 40 टक्के..पण मिळाले 35 टक्के; ठाण्याचा विशाल 10 वीत काठावर पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. या निकालात ठाण्याच्या उथळसर भागातील चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या विशाल कराड या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत 35 टक्के गुण मिळवून रेकॉर्ड केलं आहे. त्याच्या या निकालाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

SSC Results 2023 (4)

विशाल हा शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात शिकत होता. त्याचे वडील अशोक कराड रिक्षा चालवून कुटुंब चालवतात. विशालची आई ज्योती कराड या दिव्यांग असून (SSC Results 2023) त्या घरकाम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. बेताची परिस्थिती असलेल्या विशालने खूप शिकून मोठे बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. 35 टक्के गुण मिळाले तरी प्रचंड मेहनत करून भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर बनणार असल्याचे त्याने सांगितले.

 

SSC Results 2023 (6)

दरम्यान, त्याला सर्वच विषयांत मिळालेले 35 टक्के गुण हे यश इतर मुलांप्रमाणेच आहे. त्याच्या यशात आम्ही आनंदी आहोत, असे मत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त (SSC Results 2023) केले. विशाल म्हणाला की, मला 40 टक्क्यांची अपेक्षा होती, पण जे काही गुण मिळाले त्यात मी समाधानी आहे. निकाल हातात आल्यावर प्रथम मी पास आहे का, हे तपासले त्यानंतर सगळ्या विषयांत 35 मार्क मिळाल्याचे दिसले. आम्ही सर्व या यशाने खुश असल्याचे विशालने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com