करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या 10 वीच्या (SSC Results 2023) निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 10 वी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. हाती आलेल्या महितीनुसार उद्या दि. 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा पाहायचा याबाबत जाणून घेवूया…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा घेण्यात आली होती.
इथे पहा निकाल – (SSC Results 2023)
1. www.mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in
4. www.mahresult.nic.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो – (SSC Results 2023)
1. दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
2. दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. (SSC Results 2023)
3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
4. दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com