करिअरनामा ऑनलाइन | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल भरती 2021 ची प्रक्रिया, देशातील करोणाच्या वाढत्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने गेल्या महिन्यातील नऊ तारखेला जाहीर केले होते की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेचे नोटिफिकेशन देण्यात येईल. परंतु, सध्याची करोनाची परिस्थिती पाहता सदर प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केल्याचे स्टाफ सिलेक्शन कमिशनने आधिसुचना काढून स्पष्ट केले आहे.
या परीक्षेसोबतच, आयोगाने कम्बाईन हायर सेकंडरी परीक्षा (सीएचएसएल) आणि कम्बाइन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा म्हणजेच CGL परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. सदर परीक्षा 21 मे ते 7 जून या कालावधीत ऑनलाईन घेण्यात येणार होत्या. पण या ही परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत घेतल्या जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
करोना संसर्गाची भविष्यातील अवस्था पाहून या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे आयोगाने काढलेल्या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. कॉन्स्टेबल भरतीचे पहिले नोटिफिकेशन 5 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होते, पण ते त्यावेळी दोन वेळा स्थगित करण्यात आले होते.