SSC Exam 2024 : मार्च 2024 मध्ये होणाऱ्या 10वीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (SSC Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

MSBSHSE (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. आता शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन दि. 20 ऑक्टोबरपासून भरायला सुरुवात करावी. ही आवेदनपत्रे नियमित शुल्कासह पुढील महिनाभर भरता येणार असल्याचे त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अचूक भरुन सबमिट (SSC Exam 2024) केल्यानंतर आवेदनपत्रे भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांना त्यांच्या Login मधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे.
मार्च २०२४ शालान्त परीक्षेचे अर्ज आणि या प्रक्रिये संदर्भातील महत्त्वाची माहिती https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com