SSC CGL Recruitment 2024 : तब्बल 17,727 जागांवर बंपर भरती!! SSC CGL अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; त्वरा करा..

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरतीची (SSC CGL Recruitment 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. यावर्षी SSC CGL पदभरती अंतर्गत तब्बल 17,727 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

SSC CGL भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पदे भरली (SSC CGL Recruitment 2024) जातील. यामध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इंस्पेक्टर, सब- इंस्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, सीनियर सेक्रेट्रिएट असिस्टंट/ अपर डिविजन क्लर्क, ऑडिटर, टॅक्स असिस्टेंट, अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट,जूनियर स्टेट्सटिकल ऑफिसर आणि स्टेट्सटिकल इनवेस्टिगेटर ग्रेड- II या पदांचा समावेश आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – कर्मचारी निवड आयोग
भरले जाणारे पद – स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर
पद संख्या – 17,727 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024

अर्ज फी – रु. – 100/-
महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि Exservicemen (ESM) यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षेचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
SSC CGLभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तथापि, जे सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्याकडे पदवी आणि CA/CS/MBA/Cost & Management Accountant/Masters in Commerce/Masters in Business Studies असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) पदासाठी, मान्यताप्राप्त संस्थेची पदवी (12वी मध्ये किमान 60% गणित) आवश्यक आहे.
वय मर्यादा – (SSC CGL Recruitment 2024)
1. ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे: जन्म २ ऑगस्ट १९९७ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.
2. ज्या पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३० वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००४ नंतर नसावा.
3. ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-३० वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.
4. ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-३२ वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९२ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना PDF/संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.
5. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी (SSC CGL Recruitment 2024) फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
6. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे.

Combined Graduate Level Examination 2024 संबंधित महत्वाच्या तारखा

Dales tor submission of online applications24-06-2024  to 24-07-2024
Last date and time for receipt of onlineapplications24-07-2024(23:00)
Last date and lime for making online fee payment25-07-2024)23:00)
Dates of “Window for Application Form Correction* including online pa\merit.10-08-2024 lo 11-08-2024(23:00)
Tentative Schedule of lier-I (Computer BasedKxamination)Sep-Oct. 2024
Tentative Schedule of Tier-II (Computer Based Examination)December. 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (SSC CGL Recruitment 2024)
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com