करिअरनामा ऑनलाईन । यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आलेले राज्यातील सर्व विभागांचे दहावी बोर्डाचे पेपर (SSC Board Exam Results) पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आवाहन होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे. स्टेट बोर्डाचा दहावी परीक्षेचा निकाल हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी संबंधित सूत्रांनी अशी माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील. चला तर जाणून घेऊया. (SSC Board Exam Results)
‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल –
- mahresult.nic.in
- maharashtraeducation.com
- mahahsscboard.maharashtra.gov.in.
- sscresult.mkcl.org
निकाल असा चेक करा –
- इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
- SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.
- यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. (SSC Board Exam Results) विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com