SSC Board Exam 2024 : 10 वीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार हॉल तिकीट; 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC Board Exam 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता 10वी बोर्डाच्या परिक्षेचे घेतली प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना उद्या दि. 31 (बुधवार) पासून मिळणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार 10वीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे संबंधित शाळांकडून विद्यार्थ्यांना पाठवली जातील.
बुधवारपासून, सर्व माध्यमिक शाळांना बोर्डाची अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ येथे ‘स्कूल लॉगिन’ विभागातून मार्च 2024 ची प्रवेशपत्रे डाउनलोड करता येतील. तांत्रिक समस्या उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा; असं आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी बोर्डाची परीक्षा दि. १ ते २६ मार्च 2024 दरम्यान होत आहे. तसेच, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत (SSC Board Exam 2024) मूल्यमापन परीक्षा दि. १० फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रवेश पत्राविषयी महत्वाचे….
सर्व विभागीय मंडळांमधील सर्व माध्यमिक शाळांना दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्रे छापणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ऑनलाइन छापताना त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये. मुख्याध्यापकानी शिक्का वापरून, संबंधित प्रवेशपत्राच्या प्रिंटआउटवर (SSC Board Exam 2024) स्वाक्षरी करावी; अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावरील विषय किंवा माध्यम बदलल्यास, विभागीय मंडळाशी संपर्क साधून आवश्यक सुधारणा करण्याची जबाबदारी माध्यमिक शाळांची आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या स्तरावरील माध्यमिक शाळांनी प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी, नाव, जन्मतारीख, जन्मतारीख यामध्ये आवश्यक ते बदल करावेत आणि पूर्ण झालेल्या कामाची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी.

फोटो सदोष असल्यास (SSC Board Exam 2024) त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून संबंधित प्राचार्याची स्वाक्षरी करावी लागेल. तसेच, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र गहाळ झाल्यास, माध्यमिक शाळांनी ते पुनर्मुद्रण करून प्रवेशपत्राची विद्यार्थ्यांना दुसरी प्रत म्हणून लाल शाईने टिप्पण्या देऊन द्यायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com