करिअरनामा ऑनलाईन । आपण शालेय अभ्यासक्रमात (SPP University Pune) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करुन पदव्युत्तर पदवी देखील घेता येणार आहे. यामुळे छत्रपती शिवरायांची युद्धनीती, त्यांची धोरणे यांचा अभ्यास करता येणार आहे. शिवरायांनी विविध युद्धनितीचा अवलंब करुन स्वराज्याची निर्मिती केली. यासाठी त्यांना अनेक लढाया कराव्या लागल्या त्यांचे बालपण आणि जीवन चरित्र्य शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ठ नेतृत्व, राष्ट्रनिर्माते म्हणून जगभरात अभ्यासले जातात. असे असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर पूर्णवेळ अभ्यासक्रमाची अद्यापही निर्मिती झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा विषय घेऊन पदव्युत्त पदवी घेता येणार आहे.
शास्त्रीय पद्धतीने करता येणार अभ्यास
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिक विभागास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. महाराजांची शासन व्यवस्था, संरक्षण आणि सामरिक व्यवस्थेचा विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह स्वराज्यासंदर्भातील संशोधनाला अधिक चालना मिळणार आहे.
पूर्ण देशात पहिला अभ्यासक्रम (SPP University Pune)
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातच अशा प्रकारातील हा पहिला अभ्यासक्रम आहे. ‘पीजी डिप्लोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.
कोणत्या गोष्टी शिकता येणार
विभागप्रमुख आणि विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे सांगतात, गनिमी काव्यापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे अनेक पैलू येथे शिकता येणार आहेत. वर्गातील अभ्यासक्रमाबरोबरच गड-किल्यांना प्रत्यक्ष भेटी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम शिकवण्यावर विद्यापीठाचा भर असेल. सैन्यातील अधिकाऱ्यांसह या विषयातील तज्ज्ञ शिक्षक हा अभ्यासक्रम शिकविणार आहेत. सुरवातीला विद्यापीठाने पदव्युत्तर पदविका स्तरावर सुरू केलेला अभ्यासक्रम आता पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणून नावारूपाला येत आहे. नुकतेच विद्यापीठाच्या शैक्षणिक मान्यता विभागाने अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.
ही आहेत अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
1. छत्रपतींच्या भू-राजकीय, भू-संरक्षण आणि सागरी संरक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश
2. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची रचना
3. संशोधनाबरोबरच धोरणात्मक क्षेत्रात करियरच्या संधी
4. क्षेत्र भेटीबरोबरच विषय तज्ज्ञांचा सहभाग
5. पर्यटन, इतिहास, धोरणनिर्मिती, संशोधन क्षेत्राच्या दृष्टीने अभ्यास
ऑनलाईन घ्या प्रवेश
‘पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’असे या अभ्यासक्रमाचे नाव असणार आहे. शिवाजी महाराजांच्या राष्ट्र उभारणीची संकल्पना, राज्य म्हणून विचार, प्रशासन, युद्धनिती, जगभरातील योद्धांशी तुलनात्कम अभ्यास, गडकिल्ले क्षेत्रभेटी, नौदलाचे प्रणेते आदी (SPP University Pune) विषयांचा सखोल अभ्यास हे सर्व विषय अभ्यासले जाणार असल्याची माहिती संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.
या वर्षीपासून या अभ्यासक्रमाला सुरूवात होणार आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवी धारकाला या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. ‘पीजी डिल्पोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’ या अभ्यासक्रमासाठी जवळपास 20 मुलांना पहिल्या वर्षी प्रवेश दिला जाणार आहे. यातील काही जागा बाहेरील देशातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील अशी माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com