करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ने (IIT Sports Quota) आपल्या पदवीधर कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘क्रीडा कोटा’ जाहीर केला आहे. त्यामुळे आयआयटीमध्ये क्रीडा-संबंधित पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळवणं आता सोपं होणार आहे. यासाठी 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून ‘स्पोर्ट्स एक्सलन्स ॲडमिशन’ (SEA) सुरू होईल. या अंतर्गत IIT मद्रास भारतीय नागरिकांसाठी प्रत्येक पदवी अभ्यासक्रमात दोन अतिरिक्त जागा उपलब्ध करून देईल. यापैकी एक जागा केवळ महिला विद्यार्थ्यांसाठी असेल.
जरी SEA द्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याने JEE Advanced साठी पात्र असणे आवश्यक असले तरी ते जॉइंट सीट ऍलोकेशन अथॉरिटी (JoSAA) पोर्टलद्वारे होणार नाही. त्यांचे प्रवेश स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत IIT मद्रास द्वारे संचालित jeeadv.iitm.ac.in/sea या स्वतंत्र पोर्टलद्वारे केले जातील.
असे केले जाईल जागा वाटप (IIT Sports Quota)
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी JEE Advanced मध्ये कॉमन रँक लिस्ट किंवा श्रेणीनुसार रँक लिस्टमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात किमान एक पदक जिंकणे आवश्यक आहे. खेळांच्या विशिष्ट यादीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांनी मिळवलेल्या एकूण गुणांवर आधारित एक वेगळी ‘स्पोर्ट्स रँक लिस्ट’ तयार केली जाईल; ज्याच्या च्या आधारे जागावाटप केले जाईल.
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करणार
हाती आलेल्या माहितीनुसार, IIT मद्रासचे डायरेक्टर व्ही. कामकोटी (IIT Sports Quota) यांनी सांगितले आहे की, आयआयटी मद्रास प्रगत उपकरणांसह एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील सुरू करणार आहे. IIT मद्रास स्पोर्ट्स कोटा सुरू करण्याचा हा उपक्रम खेळात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करत असताना यासोबत उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com