Space Startups in India : चांद्रयान 3 मुळे ‘स्पेस स्टार्टअप’ला मिळाली गती; पहा कशी?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रयान-३ च्या यशामुळे भारताच्या (Space Startups in India) अवकाश क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीस गती मिळणार आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे ‘स्पेस स्टार्टअप’ (Space Startup) कंपन्यांना मागील काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रयान-३ नंतर त्यात आणखी वाढ होईल; असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

संशोधन संस्था ‘ट्रॅक्शन’ने जारी केलेल्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात स्पेस स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक वाढली आहे. या अहवालात म्हटले आहे की, गुंतवणुकीतील वाढीबरोबरच अवकाश (Space Startups in India) क्षेत्रातील गुंतवणुकीचा सरासरी आकारही 2020 मधील 2.8 दशलक्ष डॉलरवरून वाढून 2023 मध्ये 15 दशलक्ष डॉलर झाला आहे. या क्षेत्रात पूर्वी केवळ सरकारलाच गुंतवणुकीची परवानगी होती. 2020 मध्ये हे क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. (वृत्तसंस्था)
ल्युनार मार्केट झपाट्याने वाढणार
सल्ला संस्था ‘पीडब्ल्यूसी’च्या विश्लेषणानुसार, जगातील अनेक बडे देशही मोठ्या प्रमाणावर चंद्र मोहिमा आखत आहेत. त्यामुळे ‘चंद्र बाजार’ (ल्युनार मार्केट) झपाट्याने वाढेल. साल 2040 पर्यंत ‘चंद्र बाजार’ 170 अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com