Soumya Sharma IAS : वयाच्या 23 व्या वर्षी बनली IAS, परीक्षेच्या दिवशी होता 103 डिग्री इतका ताप (AIR 9)

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

प्रेरणादायी । सौम्या शर्मा (Soumya Sharma IAS) आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सौम्या यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 2017 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नंतर एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचा IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.

सौम्याच्या म्हणण्यानुसार त्या यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंगमध्ये सामील झाल्या नव्हत्या. सोम्या यांनी सर्व अभ्यास स्वत:च घरी केला. पूर्वपरिक्षेला चार महिणे असताना त्यांनी युपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुख्य परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वीच सोम्या यांना ताप आला. मात्र अशातही त्यांनी माघार घेतली नाही. सौम्या सांगते की, माझा ताप संपूर्ण आठवडाभर खाली आला नव्हता. परीक्षेच्या दिवशीही तापमान १०२ च्या खाली जात नव्हते. कधीकधी ते १०३ अंशांवर पोहोचत होते. मात्र तरीही सोम्या यांनी जोरदार लढत देत युपीएससी उत्तीर्ण केली. (Soumya Sharma IAS) खरे तर सौम्याने परीक्षेला बसायचे ठरवले तेव्हा पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्याकडे फक्त चार महिने होते. पण सौम्याचा उत्साह जास्त होता. सौम्याने या कमी काळात खुरूप जास्त मेहनत घेतली. तयारीच्या चार महिन्यांतच सौम्याने UPSC पूर्व परीक्षेत पात्रता मिळवली.

तापाने फणफणत असतानाच दिली मुख्य परीक्षा

सौम्याची प्री उत्तीर्ण होण्याची मेहनत आणि समर्पण तिला मुख्य परीक्षेत कामी आले. सौम्याला मुख्य परीक्षा पास करणंही सोपं नव्हतं कारण परीक्षेदरम्यान सौम्याला खूप ताप आला होता. तिची तब्येत इतकी बिघडली होती की कधी १०२ तर कधी १०३ अंश ताप यायचा. पण सौम्या अभ्यास करत राहिली आणि नंतर परीक्षा द्यायला गेली. त्या दिवसांत सौम्याला दिवसातून तीनदा सलाईन ड्रिप दिले जायचे. इतकंच नाही तर परीक्षेच्या मधल्या सुट्टीतहि सौम्याला सलाईन लावलं होतं. एवढे सगळे करूनही सौम्याने मुख्य परीक्षा क्लिअर केली.

सौम्या शर्माचा UPSC मध्ये 9वा क्रमांक (Soumya Sharma IAS)

सौम्याला ना उजळणी करायला वेळ मिळाला ना धड अभ्यासाला तिच्या आरोग्याने तिला साथ दिली. मात्र इच्छाशक्ती आणि वेळेचं नियोजन यामुळेच सौम्या यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. सौम्या शर्मा या भारतात 9वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनल्या. त्यांची ही गोष्ट आज अनेक परीक्षार्थींकर्ता प्रेरणा देणारी ठरत आहे.

सौम्याला श्रवणशक्ती नाही

सौम्याचे हे यश देखील खास आहे कारण सौम्याला ऐकू येत नाही. सौम्या 16 वर्षांची असताना अचानक तिची श्रवणशक्ती कमी झाली. सौम्याच्या उपचारासाठी पालकांनी डॉक्टरांकडे चकरा मारल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सौम्याची 90 ते 95 टक्के श्रवणशक्ती कमी झाली होती. सौम्यासाठी हा सर्वात कठीण टप्पा होता. सौम्यासाठी सर्व काही कठीण झाले. सौम्याला खूप त्रास सहन करावा लागला, मात्र नंतर तिने या धक्क्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आणि फायटरप्रमाणे आयुष्य जगू लागली. आता सौम्या श्रवणयंत्राच्या मदतीने ऐकते. Soumya Sharma IAS

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob Click Here To Join Our Whatsapp Group Click Here To Join Our Telegram Channel अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

हे पण वाचा –

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

फुल टाइम जॉब करत बनली IAS; जाणून घ्या अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास