करिअरनामा ऑनलाईन । सुप्रसिद्ध ‘3 इडियट्स’ चित्रपटात आमीर खानने (Sonam Wangchuk) रँचोची भूमिका साकारली. खऱ्या आयुष्यातील अभियंता सोनम वांगचुक सध्या लडाख वाचवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून 2 डिग्री तापमानात उपोषण करत आहे. लडाखच्या लोकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोनम वांगचुक यांनी २६ जानेवारी पासून १८,३८० फूट उंच खारदुंगला येथे उपोषणाची घोषणा केली होती. त्यांच्या मागण्यांमध्ये राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीचा विस्तार आणि अनियंत्रित औद्योगिकीकरण आणि व्यावसायिक विस्तारापासून पर्यावरणाचे रक्षण करणे यांचाही समावेश आहे. सोनम वांगचुक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 244 च्या सहाव्या अनुसूचीनुसार मी हिमालय, ग्लेशियर, लडाख आणि तेथील लोकांना वाचवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी उपोषण केले आहे.
दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी आरोप केला आहे; की त्यांना त्यांच्या संस्थेत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी वांगचुक यांचा आरोप फेटाळून लावला आहे. पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांना खारदुंगला पास येथे पाच दिवसांचे उपोषण सुरू करण्यापासून (Sonam Wangchuk) रोखण्यात आले. मीडिया वृत्तानुसार, लेह आणि कारगिलमधील प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक गट आणि विद्यार्थी संघटना सोनम वांगचुकच्या मागण्यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पी.डी. नित्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, वांगचुक यांना प्रशासनाने खारदुंगला पास येथे पाच दिवसांच्या उपोषणाला जाण्याची परवानगी दिली नाही कारण तेथील तापमान उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com