महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिकमोर्तब केले.

राज्याचे सध्याचे मुख्य सचिव पदी असलेले संजयकुमार आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कुंटे हे उद्या पदभार स्वीकारतील.

1985 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सीताराम कुंटे आता राज्याचे मुख्य सचिव पदभार स्वीकारतील , तर त्यांच्या जागी 1986 बॅचचे अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदभर स्वीकारतील.