SEBI Recruitment 2024 : 5.85 लाखापर्यंत पगार मिळवायचा असेल तर इथे करा अर्ज; SEBI अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI Recruitment 2024) म्हणजेच SEBI अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक (Executive director) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे. विशेष बाब म्हणजे कार्यकारी संचालक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास दरमहा साधारण 4.89 लाख ते 5.85 लाख रुपयांदरम्यान वेतन मिळेल. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – कार्यकारी संचालक
पद संख्या – 1 पद
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
आज करण्याची शेवटची तारीख – 13 जुलै 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SEBI Recruitment 2024)
1. कार्यकारी संचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे CA / CS /CFA / CWA / LLB / फायनान्स क्षेत्रात MBA/MMS सह स्पेशलायझेशन असावे.
2. तसेच उमेदवाराकडे अर्थशास्त्रात (Economics) पदव्युत्तर शिक्षण (Post Graduation) असावे.
मिळणारे वेतन –
कार्यकारी संचालक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास दरमहा साधारण ४.८९ लाख ते ५.८५ लाख रुपयांदरम्यान वेतन मिळेल.
वय मर्यादा – 40 ते 55 वर्षे

असा करा अर्ज –
1. कार्यकारी संचालक या पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज करायचा असल्यास त्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. (SEBI Recruitment 2024)
2. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना नोकरीच्या अधिसूचनेत सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचून अर्ज पाठवायचा आहे.
3. उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
4. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२४ अशी आहे.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.sebi.gov.in/index.html
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com