School Holidays : एप्रिलमध्ये शाळेला मिळणार ‘इतक्या’ सुट्या; पहा यादी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपुर्वी इयत्ता दहावी, बारावीच्या (School Holidays) परीक्षा संपल्या आहेत. आता अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांची लगबग सुरु आहे. यासोबतच मुलेही सुट्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्यात अनेक सण येत आहेत आणि यासह शनिवार आणि रविवारची सुट्टी तर आहेच. गुड फ्रायडे, ईद, रमजान असे अनेक मोठे सण एप्रिलमध्ये येत असल्याने मुलांना लांब सुट्ट्या मिळणार आहेत. कौटुंबिक सहलीची योजना आखत असलेल्या पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एप्रिलमध्ये किती दिवस शाळेला सुट्टी आहे? हे जाणून घेवूया..
एप्रिलमध्ये शाळेत शिकणाऱ्या मुलांना जास्त दिवस मौजमजा करता येणार आहे. त्यांना सलग अनेक दिवस सुट्या मिळणार आहेत, त्याचप्रमाणे या महिन्यात 5 रविवार (School Holidays) येत असून अनेक शाळांमध्ये शनिवारच्या सुट्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे जोडून येणाऱ्या सुटीचा आनंद घेता येणार आहे.

एप्रिलमधील सुट्ट्यांची यादी – (School Holidays)
१ एप्रिल – शनिवार
२ एप्रिल – रविवार
४ एप्रिल – महावीर जयंती
७ एप्रिल – गुड फ्रायडे
८ एप्रिल – शनिवार
९ एप्रिल – रविवार
१४ एप्रिल – आंबेडकर जयंती
१५ एप्रिल – शनिवार (School Holidays)
१६ एप्रिल – रविवार
२१ एप्रिल – रमजान
२२ एप्रिल – ईद उल फित्र
२३ एप्रिल – रविवार
२९ एप्रिल – जानकी नवमी
३० एप्रिल – रविवार

जवळपास १५ दिवस शाळा बंद राहणार आहेत. यंदा एप्रिल महिन्यात ५ रविवार आणि ५ शनिवार असल्याने त्यादिवशी शाळा बंद असतील. काही शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर काहींना शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असते. याशिवाय अनेक महापुरुषांच्या जयंती (School Holidays) या महिन्यात येत आहेत. तसेच एप्रिलमध्ये महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, ईद देखील असते त्यामुळे मुलांना लांब सुट्टीचा आनंद घेता येईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com