करिअरनामा ऑनलाईन । दिव्यांग विद्यार्थ्यांचे (Scholarship for Handicapped Students) सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या विभागामार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना दि. ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (NSP) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या कालावधीत ऑनलाइनद्वारे भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष (Scholarship for Handicapped Students)
1. अनुदानित शाळांतील इयत्ता 9वी आणि 10 वीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2. – शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील.
3. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा जास्त असावे.
4. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे
5. पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
किती आहे शिष्यवृत्तीची रक्कम
दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम 9 हजार ते 14 हजार 600 रुपये इतकी आहे.
अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा
1. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : दि. 30 नोव्हेंबर
2. शाळास्तरावरील अर्ज पडताळणी अंतिम तारीख : दि. १५ डिसेंबर
3. जिल्हा स्तर अर्ज पडताळणी मुदत : दि. ३० डिसेंबर
अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
1. www.scholarships.gov.in
2. www.depwd.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com