करिअरनामा ऑनलाईन। परदेशात शिक्षण घेण्याचे बहुतेक तरुणांचे (Scholarship) स्वप्न असते. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील वायपापा तोमाता राऊ विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी देत आहे. हे विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी 1.5 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 30 लाख 69 हजार 431 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देत आहे. या शिष्यवृत्तीसाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट auckland.ac.nz वर अर्ज करावा लागेल. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतरच तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता.
हाय अचिव्हर्स स्कॉलरशिप
या शिष्यवृत्तीचे नाव हाय अचिव्हर्स स्कॉलरशिप असे आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. (Scholarship)
इच्छुक विद्यार्थी 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
यानंतर, तुम्ही 9 मार्च 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत पुन्हा अर्ज करू शकाल.
एवढी मिळेल स्कॉलरशिप (Scholarship)
ऑकलंड विद्यापीठाने दिलेली ही शिष्यवृत्ती अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. ऑकलंड विद्यापीठाने देऊ केलेली ही शिष्यवृत्ती 2 वर्षांतून एकदा दिली जाईल. तसेच 115 शिष्यवृत्ती आहेत, ज्या वर्षातून दोनदा दिल्या जातील.
अशी मिळवा शिष्यवृत्ती
दरवर्षी 20 हजार डॉलर्सपर्यंतच्या 5 शिष्यवृत्ती उपलब्ध असतील. त्याचबरोबर 10 हजार डॉलर्स आणि 5 हजार डॉलर्सपर्यंतच्या 100 शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. (Scholarship)
शिष्यवृत्ती कशासाठी?
हाय अचिव्हर्सने देऊ केलेल्या या शिष्यवृत्ती खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 200 हून अधिक शिष्यवृत्तीची तरतूद ठेवण्यात आली आहे. या (Scholarship) विशेष शिष्यवृत्तीचा उद्देश भारतातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करणे आणि त्यांना ऑकलंड विद्यापीठात एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पूर्णवेळ अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com