खूशखबर! कॉस्ट कटिंग नव्हे तर यावर्षी तब्बल १४ हजाराची बंपर भरती करणार- SBI

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडिया खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने स्वेच्छानिवृत्ती (VRS2020) योजना सुरू करणार असल्याचे वृत्त आले होते. आता त्यावर बँकेने खुलासा केला आहे. व्हिआरएस म्हणजे कॉस्ट कटिंग नव्हे. तर बँक या वर्षी १४ हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. SBI ने सांगितल्याप्रमाणे आपला व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी त्यांना आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. यासाठीच बँक या वर्षी १४ हजार नवे कर्मचारी भरती करून घेणार आहे.

सध्या बँकेकडे २ लाख ५० हजार इतके कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतला आहे. देशातील युवकांना देखील संधी देण्यात बँकेने पुढाकार घेतला आहे. एसबीआय ही देशातील एकमेव बँक आहे जी नॅशनल आपरेंटिसशिप स्किमीनुसार युवकांना काम देते, असे बँकेने म्हटले आहे.

काय आहे बँकेचं म्हणणं?
बँकेद्वारे जाहिर करण्यात आलं की, ‘बँक कायम कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्वक वागते. बँक आपला व्यवहार वाढवत आहे. ज्याकरता आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, बँकेला १४,००० पदांकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे.’ त्यांनी म्हटल्यानुसार, स्टेट बँकेत सध्या जवळपास अडीच लाख कर्मचारी आहे. बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या गरजा जाणून त्या पूर्ण करू इच्छिते.

काय आहे बँकेची VRS2020 योजना
स्वेच्छानिवृत्तीखेरीज ज्या कर्मचाऱ्यांना बँकेत सर्व प्रकारचे लाभ मिळाले आहेत, ज्यांना नोकरीत यापुढे राहण्यात वैयक्तिक समस्या येत आहेत व जे कर्मचारी आपल्या कारकीर्दीत साचलेपण अनुभवत अशा कर्मचाऱ्यांना नोकरीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यासाठीही सन्माननीय तोडगा बँकेने देऊ केला आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना बँकेत २५ वर्षांची नोकरी झालेल्या किंवा वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असणार आहे. ही योजना १ डिसेंबरपासून खुली होणार असून ती पेब्रुवारी २०२१ पर्यंत खुली राहणार आहे.

जे कर्मचारी या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीसाठी अर्ज करतील त्यांना त्यांच्या नोकरीच्या राहिलेल्या काळासाठी ५० टक्के वेतन सानुग्रह रक्कम म्हणून दिले जाणार आहे. या योजनेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा सेवेत यायचे असेल तर तो मार्ग खुला राहणार आहे. यापूर्वी स्टेट बँकेने २००१ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली होती.

कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार?
जे कर्मचारी ही वीआरएस स्विकारणार आहेत. त्यांना वास्तविक रिटायरमेंट तारखेपर्यंतच्या कालावधीकरता वेतनाच्या ५० टक्के एक्स ग्रेशियाच्या रुपात दिले जाणार आहे. याचप्रमाणे ग्रॅज्युटी, पेंशन, भविष्य निधी आणि मेडिकल बेनिफिट्सचा देखील फायदा होणार आहे.