SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाची मोठी जॉब ओपनिंग!! 442 पदांवर होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला बँकेत नोकरी (SBI Recruitment 2023) करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियाने भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या बँकेत विविध पदांवर बंपर भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 442 व्यवस्थापकीय आणि विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

अशी होईल निवड –
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर होणार आहे. निवड (SBI Recruitment 2023) प्रक्रियेमध्ये शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यांचा समावेश असेल.
अर्ज फी –
1. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे.
2. SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
(उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग इत्यादीद्वारे अर्ज फी भरू शकतात.)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
परीक्षेची अपेक्षित तारीख – डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024
असा करा अर्ज – (SBI Recruitment 2023)
1. प्रथम SBI करिअर पेज sbi.co.in/web/careers वर जा.
2. त्यानंतर होम पेजवरील SCO 2023 नोंदणी लिंकवर क्लिक करा
3. नंतर उमेदवार नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रिया करा
5. त्यानंतर फॉर्म सबमिट करा
6. यानंतर अर्ज डाउनलोड करा
7. शेवटी पुढील गरजांसाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com