SBI Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची मेगाभरती!! PO पदांच्या 2 हजार जागा भरणार; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment 2023) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल. प्रीलीम्स (पूर्व), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत असे भरतीचे तीन टप्पे असतील. SBI शाखांमध्ये PO म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना तीनही टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे.

बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
भरले जाणारे पद – परिविक्षाधीन अधिकारी (PO)
पद संख्या – 2000 पदे
भरतीचा तपशील –
1. जनरल : 810 पदे
2. ओबीसी : 540 पदे
3. ईडब्ल्यूएस : 240 पदे
4. एससी : 300 पदे
5. एसटी : 150 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2023

शिक्षण- (SBI Recruitment 2023)
अर्ज केलेल्या उमेदवारांची येत्या नोव्हेंबर महिन्यात SBI ची प्रिलिम परीक्षा घेतली जाईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली असावी. जे विद्यार्थी अंतिम वर्षात शिकत आहेत त्या उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. परंतु या उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
वय मर्यादा-
Probationary Officer पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा एप्रिल २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावी. या वयोमर्यादेच्या पुढील उमेदवारांना पदासाठी अर्ज करता येणार नाही. परंतु काही शासकीय नियमानुसार श्रेणीनिहाय वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

अर्ज प्रक्रिया आणि फी –
7 सप्टेंबर पासून एसबीआय पीओ पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/documents/77530/36548767/060923-1_detailed+Advt.+English+PO+23-24_07.09.2023.pdf/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरत्यावेळी EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. ७५० भरावे लागतील. परंतु SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

परिक्षा –
SBI PO नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना सर्वात (SBI Recruitment 2023) प्रथम प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर त्यांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. या मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना सायकोमेट्रिक चाचणी, ग्रुप एक्सरसाइज आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची निवड पदासाठी केली जाईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com