करिअरनामा ऑनलाईन । स्थलांतर हे मानवासाठी नवीन नाही. कामाच्या (Salary Ratio in India) निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि गावांकडून शहरांमध्ये स्थलांतर होतच असते. एवढेच नाही तर एका राज्यातून दुसरा राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. जेव्हा कामानिमित्त स्थलांतर होते तेव्हा ज्या ठिकाणी आपल्याला कामासाठी जायचे आहे त्या ठिकाणी असलेली कामाची उपलब्धता किंवा नोकऱ्यांची उपलब्धता, त्या ठिकाणी मिळणारे पगार व इतर सोयी सुविधांचा विचार प्रामुख्याने केला जातो.
हीच बाब दुसऱ्या राज्यात कामाला किंवा नोकरीच्या निमित्ताने जाताना सुद्धा प्रामुख्याने पाहिली जाते. कारण नोकरीसाठी दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या शहरांमध्ये जात असताना आपल्याला ज्या ठिकाणी कामाचा मोबदला जास्तीत जास्त मिळेल त्या ठिकाणी जाण्याला बरेच जण पसंती देतात. यामध्ये जर आपण मासिक पगाराचा विचार केला तर भारतामध्ये सरासरी मासिक वेतन हे राज्यानुसार वेगवेगळे आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात नोकरीनिमित्त जाण्याचा निर्णय घेत असाल तर त्या ठिकाणचे सरासरी मासिक वेतन किती आहे; हे पाहूया…
देशातील काही राज्यातील सरासरी मासिक पगार –
1 उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर या ठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त इतर राज्यांमध्ये जातात. परंतु असे असताना देखील उत्तर प्रदेश या (Salary Ratio in India) देशातील सर्वाधिक सरासरी मासिक वेतन देणारे राज्य असून ते इतर राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील प्रति व्यक्तीचा सरासरी मासिक पगार पाहिला तर तो 20 हजार 730 रुपये इतका आहे.
2 पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल हे साधारणपणे औद्योगिक दृष्ट्या मागासलेले राज्य असून देखील हे सरासरी मासिक वेतन देण्यामध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल मध्ये एका व्यक्तीचा सरासरी मासिक पगार हा 20,210 इतका आहे.
3 महाराष्ट्र – या यादीत तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत असे राज्य असून कृषी क्षेत्रात देखील महाराष्ट्रामध्ये खूप मोठा विकास झालेला आहे. जर या ठिकाणी असलेल्या सरासरी मासिक पगाराचा विचार केला तर तो 20 हजार 11 रुपये इतका आहे.
4 बिहार – बिहार देखील एक औद्योगिकदृष्ट्या मागासलेले राज्य असून औद्योगिक विकास झाला नसल्यामुळे या ठिकाणचे बरेच लोक इतर राज्यांमध्ये कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. असे असताना देखील मासिक सरासरी पगार देणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये बिहार चौथ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न 19,960 रुपये इतके आहे.
5 राजस्थान- या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य असून या ठिकाणी देखील हवा तेवढा औद्योगिक विकास झालेला नाही. या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न हे 19,740 रुपये आहे.
6 मध्य प्रदेश – मध्यप्रदेश राज्य कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण असून कृषी क्षेत्राचा या ठिकाणी चांगल्याप्रकारे विकास झालेला आहे. तसेच औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून देखील मध्य प्रदेश एक महत्त्वाचे राज्य आहे. या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न हे 19,740 इतके आहे.
7 तामिळनाडू- (Salary Ratio in India) हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून हे राज्य प्रगत आहे. या राज्यामध्ये सरासरी मासिक उत्पन्न 19 हजार सहाशे रुपये असून या यादीमध्ये ते सातव्या क्रमांकावर आहे.
8 कर्नाटक- हे देखील देशातील एक महत्त्वाचे राज्य असून महाराष्ट्राच्या शेजारी असलेले राज्य आहे. हे राज्य देखील आता झपाट्याने विकसित होत असून या यादीमध्ये ते आठव्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी सरासरी मासिक उत्पन्न हे 19,150 इतके आहे.
9 गुजरात – औद्योगिक दृष्टिकोनातून अतिशय प्रगत समजले जाणारे आणि व्यापार उदीमसाठी देखील गुजरात खूप प्रसिद्ध राज्य आहे. परंतु असे असताना देखील सरासरी मासिक उत्पन्न असलेल्या यादीमध्ये गुजरात नवव्या क्रमांकावर असून या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न हे 18,880 रुपये इतके आहे.
10 ओडिसा – या यादीमध्ये ओडिसा हे दहाव्या स्थानावर असून या ठिकाणचे सरासरी मासिक उत्पन्न 18 हजार 790 रुपये इतके आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com