करिअरनामा ऑनलाईन। वर्कफोर्स कंसल्टेंसी ईसीए इंटरनेशनलच्या सर्वेनुसार 2023 मध्ये (Salary Growth) महागाई कमी होऊन भारत पगारवाढीत अव्वल असणार आहे. सोबतच या रिपोर्टनुसार पाकिस्तान, श्रीलंका चीन सारख्या देशांना भारत मागे टाकणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
सर्व्हे काय सांगतो?
68 देशांमधील 360 हून अधिक मल्टीनॅशनल कंपन्यांकडून एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे सॅलरी ट्रेंड सर्व्हे करण्यात आला. त्यातून ही बाब समोर आली आहे. या सर्व्हेतून समोर आले की जगातील 37% देशांमध्ये 2023 मध्ये पगार वाढ होणार ज्यामध्ये भारत अव्वल असणार आहे.
टॉप 10 देशांमध्ये 8 आशियाई देश (Salary Growth)
विशेष म्हणजे आशियाई देशांसाठी आनंदाची बाब आहे. कारण पगार वाढणाऱ्या टॉप 10 देशांमध्ये 8 आशियाई देशांचे नाव आहे. यात सर्वात पहिले नाव भारताचे आहे. भारतात 4.6% पगार वाढीची शक्यता आहे. तर दुसऱ्या स्थानी वियतनामचे नाव आहे, येथे पगार वाढीची शक्यता 4.0% आहे. त्यानंतर चीनचं नाव आहे येथे 3.8% पगार वाढीची शक्यता आहे.
2022च्या पहिल्या सहा महिन्यामध्ये नोकरी सोडण्याचे प्रमाण (Salary Growth) वाढले होते. जवळपास 20.3 टक्के लोकांनी या काळात नोकऱ्या सोडल्या. या कारणांमुळे पगार वाढीचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.
ई-कॉमर्स सेक्टरमध्ये इतकी पगार वाढ अपेक्षित
सर्वात जास्त हाइक ई-कॉमर्स कंपन्यांना दिली जाऊ शकते. या सेक्टरमधील कर्मचाऱ्यांचा पगार 12.8 टक्के वाढू शकतो. प्रोफेशनल सर्विसेजमध्ये 12.1 टक्के तर आईटी सेक्टरमध्ये 1.3 टक्के आणि फाइनेंशियल सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार 10.5 टक्के वाढू शकतो
याप्रमाणात होवू शकते पगारवाढ –
India (4.6 per cent)
Vietnam (4.0 per cent)
China (3.8 per cent)
Brazil (3.4 per cent)
Saudi Arabia (2.3 per cent)
Malaysia (2.2 per cent)
Cambodia (2.2 per cent)
Thailand (2.2 per cent) (Salary Growth)
Oman (2.0 per cent)
Russia (1.9 per cent)
Pakistan (-9.9 per cent)
Ghana (-11.9 per cent)
Turkey (-14.4 per cent)
Sri Lanka (-20.5 per cent)
Argentina (-26.1 per cent)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com