Sainik School Admission 2024 : ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रिया सुरु; पहा अर्ज प्रक्रिया, परीक्षा, पात्रतेविषयी सविस्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जिद्द, शिस्त, अनुशासन आणि (Sainik School Admission 2024) उत्तम शिक्षणासाठी देशातील सैनिक स्कूल ओळखल्या जातात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, शिस्त व त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संरक्षण सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल्सची स्थापना करण्यात आलेली आहे. देशभरातील सैनिक स्कूलमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा राबविली जाते. प्रवेशासाठी पूर्व परीक्षा आणि मुलाखती होणार असून याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना सैनिकी शाळेत चांगले शिक्षण देण्यासाठी ही योग्य संधी निर्माण झाली आहे. पाहूया सविस्तर…

सैनिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी, विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल प्रवेश पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. 2024 मध्ये होणाऱ्या सैनिक शाळा प्रवेशाच्या आवश्यकतेनुसार, विद्यार्थ्यांनी किमान वय आणि शैक्षणिक आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे. सैनिक शाळेच्या अधिसूचनेनुसार पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत.

सैनिक शाळा २०२४ साठी प्रवेश पात्रता (Sainik School Admission 2024)
1. इयत्ता 6वी

३१ मार्च २०२४ रोजी १० ते १२ वयोगटातील मुले.
विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता पाचवीत शिकत असावा.
2. इयत्ता 9वी
इयत्ता नववीसाठी सैनिक स्कूल प्रवेश २०२४ साठी पात्रता
३१ मार्च २०२४ पर्यंत ज्या मुलांचे वय १३-१५ वर्षे आहे.
विद्यार्थ्याने इयत्ता आठवीमध्ये मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घेतला पाहिजे.

कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक 
1. उमेदवाराचे छायाचित्र
2. उमेदवाराची स्वाक्षरी
3. उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा. (डाव्या हाताचा अंगठा अनुपलब्ध असल्यास, उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा वापरला जाऊ शकतो).
4. सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जन्मतारीख प्रमाणपत्र.
5. रहिवासी प्रमाणपत्र (Sainik School Admission 2024)
6. जात/समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास).
7. माजी सैनिकांसाठी सेवेचे प्रमाणपत्र (संरक्षण श्रेणी-सेवेसाठी लागू असल्यास)
8. अर्जदार मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळेत शिकत असल्याचे प्रमाणित करणारे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र.
(केवळ सध्या मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळांमध्ये शिकत असलेल्यांसाठी लागू).
(टीप – सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपीमध्ये असणे आवश्यक आहे.)

अर्ज सादर करण्याची तारीख –
ऑनलाइन अर्ज सादर करणे – दि. 16 डिसेंबर 2023 (सायंकाळी 05:00 पर्यंत)
अधिकृत वेबसाईट – https://aissee.co.in/
परीक्षेविषयी –
1. परीक्षेची पद्धत- ऑफलाईन
लेखी परीक्षेसाठी एकूण गुण – इयत्ता सहावीसाठी – ३०० गुण
इयत्ता नववीसाठी- ४०० गुण
2. परीक्षेचा कालावधी-
इयत्ता सहावीसाठी – १५० मिनिटे
इयत्ता नववीसाठी- १८० मिनिटे

3. परीक्षेची वेळ-
इयत्ता सहावी – दुपारी २ ते ४ : ३०
इयत्ता नववी- दुपारी २ ते ५ पर्यंत
4. निवड प्रक्रिया – लेखी चाचणी त्यानंतर वैद्यकीय चाचणी

इयत्ता 9वीसाठी असा असेल परीक्षेचा पॅटर्न
विभाजन – विषय- प्रश्न आणि गुण/प्रश्नांची संख्या- एकूण गुण कालावधी (मिनिटांमध्ये)
१- गणित- ५० x ३- १५० -६०
२ -इंग्रजी- २५ x २ -५० -३० (Sainik School Admission 2024)
३ -बुद्धिमत्ता -२५ x २ -५०- ३०
४ -सामान्य विज्ञान -२५ x २ -५० -३०
५ -सामाजिक अभ्यास- २५ x २- ५० -३०
-एकूण- १५० प्रश्न -४०० -१८०

इयत्ता 6 वीसाठी असा असेल परीक्षेचा पॅटर्न
विभाजन – विषय -प्रश्न आणि गुण/ प्रश्नांची संख्या- एकूण गुण कालावधी (मिनिटे)
१- गणित- ५० x ३- १५० -६०
२ -जीके (एससी आणि एसएसटी) -२५ x २ -५० -३०
३ -भाषा -२५ x २- ५० -३०
४ -बुद्धिमत्ता -२५ x २- ५० -३०
– एकूण- १२५ प्रश्न- ३०० -१५०
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com