RRB Group D Exam : रेल्वे भरती परीक्षा झाली… ‘हे’ असतील Physical आणि Medical टेस्टचे निकष

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेचा 5वा आणि अंतिम टप्पा 11 नोव्हेंबर (RRB Group D Exam) रोजी संपला. आता परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार Answer Key आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. RRB ग्रुप डी परीक्षेची Answer Key 15 दिवसांत म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेमध्ये Group D च्या 1.3 लाख रिक्त पदांवर भरती होणार आहे. RRB ग्रुप डी परीक्षेसाठी एकूण 1.15 कोटी अर्ज आले होते. आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेचा पहिला टप्पा 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

सामान्यीकरण फॉर्म्युला लागू होणार 

RRB ग्रुप डी परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतल्या जात असल्याने, रेल्वेने सामान्यीकरण फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. RRB ने या संदर्भात खूप पूर्वी अधिसूचना (RRB Group D Exam) जारी केली होती. मार्किंग कसे केले जाईल, हे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. Normalization पद्धतीत percentile वापरण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

RRB ग्रुप D CBT परीक्षेनंतर पुढे काय?(RRB Group D Exam)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

RRB ग्रुप डी (लेव्हल-1) मध्ये एकच स्टेज टेस्ट असेल. दुसरा CBT नसेल. गट डी परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या उमेदवाराला शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच पीईटी उत्तीर्ण करावी लागेल.

असे असतील शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) निकष

  • पुरुष उमेदवारांसाठी
  1. 35 किलो वजनासह 100 मीटरचे अंतर 2 मिनिटांत कापावे लागेल.
  2. एक किलोमीटर 4 मिनिटे 15 सेकंदात धावावे लागेल.
  • महिला उमेदवारांसाठी (RRB Group D Exam)
  1. 20 किलो वजनासह, तुम्हाला 2 मिनिटांत 100 मीटर धावावे लागेल.
  2. एक किलोमीटर 5 मिनिटे 40 सेकंदात धावावे लागेल.

आरआरबी ग्रुप डी कागदपत्रे पडताळणी

  1. RRB गट डी भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणीचा असेल. जे उमेदवार शारीरिक कार्यक्षमता चाचणीत पात्र ठरतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  2. कागदपत्र पडताळणीसाठी, रिक्त पदांपेक्षा दुप्पट उमेदवारांना आमंत्रित केले जाईल. गुणवत्ता आणि पर्यायाच्या आधारे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

वैद्यकीय चाचणी

RRB गट डी निवड प्रक्रियेतील चौथा आणि अंतिम टप्पा वैद्यकीय चाचणीचा असेल.

यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये डोळ्याच्या दृष्टीपासून इतर अनेक चाचण्या होतील.

RRB गट D पदांसाठी नेमणूक कधी होईल?

रेल्वे भरती बोर्डाने 3 ऑक्टोबर रोजी एक आदेश जारी केला होता. त्यात एप्रिल 2023 पर्यंत रेल्वेच्या 17 झोनमध्ये एक लाख 52 हजार 713 रिक्‍त पदे पूर्ववत करण्‍यात येतील, असे (RRB Group D Exam) सांगण्यात आले होते. फेब्रुवारीपर्यंत शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलमध्ये रुजू करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com