करिअरनामा ऑनलाईन । रिंकू आयपीएलमध्ये ज्या प्रकारची (Rinku Singh) कामगिरी करत आहे. त्यावरून त्याला चांगले पैसे मिळत असतील, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र बाकीच्या खेळाडूंच्या तुलनेत रिंकूला केकेआरकडून खूप कमी पैसे मिळतात. कोलकाताला विजय मिळवून देणाऱ्या रिंकूला आयपीएलमध्ये खूपच कमी मानधन मिळते. त्याने ज्याच्या बॉलवर 5 षटकार ठोकले त्या यश दयालला देखील जास्त पैसे मिळतात.
आयपीएल 2023 च्या 13 सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने गुजरात टायटन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या काटेरी लढतीत तीन गडी राखून पराभव केला. कोलकाताने गुजरातच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. या विजयाचा झेंडा रोवला तो केकेआरचा (Rinku Singh) स्टार फलंदाज रिंकू सिंगने. रिंकूने शेवटच्या षटकात गुजरातचा गोलंदाज यश दयालच्या बॉलवर 5 षटकार ठोकून त्याच्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.
या सीजनमध्ये रिंकूला आयपीएलमध्ये मिळणारा पगार 55 लाख रुपये आहे. रिंकूच्या नावाचा विचार केला तर ही रक्कम खूपच कमी आहे. आयपीएल 2022च्या मेगा लिलावात KKR ने त्याला या रकमेत विकत घेतले. आणि 2023 च्या आयपीएलमध्ये त्याला या संघाने कायम ठेवले होते.
2018 च्या मेगा ऑक्शनमध्ये KKR ने रिंकूला 80 लाख रुपयांना विकत घेतले. मात्र त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. आयपीएल 2021 च्या पहिल्या सहामाहीत (Rinku Singh) दुखापत झाल्यामुळे या खेळाडूंना संपूर्ण हंगामातून बाहेर काढण्यात आले. नंतर जेव्हा तो संघात परत आला तेव्हा त्याला फक्त 55 लाख रुपये मानधन मिळाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com