करिअरनामा ऑनलाईन । घर, इमारत किंवा जमीन विकणारा (Real Estate Agent) आणि घर, इमारत तसेच जमीन हवे असणारा या दोघांमधील दुवा म्हणून ‘रिअल इस्टेट एजंट’ म्हणजेच मध्यस्थ काम करत असतो. दोन्ही बाजूच्या पार्टीचे समाधान करत स्वत:चा निर्वाह करण्याची भूमिका पार पाडणाऱ्या या मध्यस्थाला आता सक्षमता प्रमाणपत्र अर्थात Competency certificate मिळवावे लागणार आहे.
उद्या शनिवार दि. 20 मे रोजी रिअल इस्टेट एजंटसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. अशाप्रकारचा प्रयोग महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणातर्फे (महारेरा) प्रथमच करण्यात येणार आहे. रिअल इस्टेट एजंट हा घर, प्लॉट वा फ्लॅट अशा प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहारातील महत्त्वाचा (Real Estate Agent) घटक आहे. या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट एजंटच्या कार्यपद्धतीमध्ये सुसंगतता यावी, खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंबंधी संपूर्ण कायदेशीर माहिती असायला हवी या सर्व बाबींचा विचार करून महारेराने एजंटसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरुप निश्चित केले आहे.
1. जे रिअल इस्टेट एजंट महारेराकडे पूर्वीपासून नोंदणीकृत आहेत, त्यांना पुनर्नोंदणीसाठी 1 सप्टेंबर 2023 पर्यंत महारेराकडून सक्षमता प्रमाणपत्र मिळवायचे असून ते एजंटला स्वत:च्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे.
2. महारेराने 1 जानेवारी 2023 रोजी अधिसूचना काढत (Real Estate Agent) रिअल इस्टेट एजंटला परीक्षा देणे अनिवार्य केले आहे.
3. आजघडीला राज्यात 38 हजार 771 रिअल इस्टेट एजंट महारेराकडे नोंदणीकृत आहेत.
4. परीक्षेच्या पहिल्याच प्रयोगात त्यातील 457 एजंट सहभागी होतील.
5. नागपूरसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे परीक्षा होणार आहे.
6. यासाठी महारेराने रिअल इस्टेट एजंट, बँकिंग संस्था, घर खरेदीदार, प्रवर्तक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स यांच्याशी चर्चा करून अभ्यासक्रम तयार केला आहे.
7. एजंटच्या सुविधेनुसार हा अभ्यासक्रम ऑनलाइन, प्रत्यक्ष किंवा हायब्रिड (ऑनलाइन व प्रत्यक्ष दोन्ही) स्वरूपात उपलब्ध आहे. (Real Estate Agent)
8. या अभ्यासक्रमाची पहिली बॅच 20 मे रोजी परीक्षा देणार आहे. जे एजंट ही परीक्षा उत्तीर्ण करतील त्यांना सक्षमता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
9. केवळ प्रमाणपत्रप्राप्त व्यक्तीच रिअल इस्टेट एजंट म्हणून महारेराकडे नोंदणी करू शकणार आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com