Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : थेट द्या मुलाखत!! रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये शेकडो पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेने संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेत नोकरी मिळवण्याची अनेक उमेदवारांची इच्छा असते. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांना मनासारखी नोकरी मिळू शकते; त्यामुळे उमेदवारांनी या संधीचा फायदा करुन घ्यायचा आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीने ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून मुलाखतीची तारीख 03 मार्च 2024 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा
शाळा – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
भरली जाणारी पदे – प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला/नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक
पद संख्या – 139 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024)
मुलाखतीची तारीख – 03 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-415001
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्राचार्य01
उपप्राचार्य01
पर्यवेक्षक/समन्वयक04
के.जी. शिक्षक30
प्राथमिक शिक्षक66
उच्च प्राथमिक शिक्षक32
माध्यमिक शिक्षक20
क्रीडा शिक्षक05
कला/नृत्य आणि संगीत शिक्षक04
संगणक शिक्षक06
ग्रंथपाल04
शिक्षण समुपदेशक02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राचार्यB.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Principal
उपप्राचार्यB.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Vice Principal
पर्यवेक्षक/समन्वयकB.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed. with 3 to 4 Years experience
के.जी. शिक्षकK.G. Teacher/Montessori (Trained)/ Certificate Programme in Early Childhood & Special Education
प्राथमिक शिक्षकH.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A..B.Ed. with 2 to 3 Years experience
उच्च प्राथमिक शिक्षकB.Sc./B.A., B.Ed./D.El.Ed. with 2 Years experience
माध्यमिक शिक्षकM.Sc./B.Sc./M.A./B.A..B.Ed./M.Ed. with 2 Years experience
क्रीडा शिक्षकB.Sc./B.A.,B.P.Ed. with 2 Years experience
कला/नृत्य आणि संगीत शिक्षकA.T.D./Craft/Music Visharad
संगणक शिक्षकBCA/MCA/Diploma in Computer Science with 2 years experience
ग्रंथपालBachelor of Library and Information Science/ Diploma in Library
शिक्षण समुपदेशकB.A/B.Sc/Psychology with Certificate of Diploma in Guidance in counseling

निवड प्रक्रिया – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024)
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 03 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com