Ramayan will be Taught in Madrassas : वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय!! मदरशांमधील मुले गिरवणार रामायणाचे धडे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनानंतर (Ramayan will be Taught in Madrassas) संपूर्ण देशात राम मंदिराच्या भव्यदिव्यतेची आणि रामयुगाची चर्चा सुरु आहे. असे असताना आता एक आनंदाची बातमी येवून धडकली आहे. उत्तराखंडमधील मदरशांमध्येही आता रामायणाचे धडे दिले जाणार आहेत. वक्फ बोर्डाने याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये आता रामायण शिकवलं जाणार आहे. मदरशांमध्ये रामायणाचा अभ्यासक्रम म्हणून समावेश केला जाणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या एकूण 117 मदरशांपैकी चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

117 मदरशांमध्ये सुरु होणार अभ्यासक्रम (Ramayan will be Taught in Madrassas)
बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाईल. शिक्षकांची भरती झाल्यानंतर उर्वरित 113 मदरशांमध्ये ही नियुक्ती केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Ramayan will be Taught in Madrassas)
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी अशी माहिती दिली आहे की, मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. यामाध्यमातून मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मदरशातील मुलांचा ड्रेसकोड देखील बदलण्यात येणार आहे.

कुराण आणि रामायण दोन्ही शिकवले जाणार
उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की, कुराणसोबतच विद्यार्थ्यांना रामायणही शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्ड चार मदरशांसाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती करेल, त्यांना या विषयात पारंगत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम दिले जाईल. तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या परिचयासाठी विस्तृत व्यवस्था केली जाणार आहे.
निवड झालेल्या चार मदरशांना स्मार्ट क्लासरूमसह (Ramayan will be Taught in Madrassas) विकसित केले जाणार आहे. तसेच या संस्थांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे आणि आम्ही नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुस्तके सादर करण्याच्या प्रक्रियेत आहोत; असे शादाब शम्स यांनी सांगितले. तर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांच्या मते, या वर्षी मार्चपासून आमच्या मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांमध्ये श्री रामचा अभ्यास सुरू केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com