Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32 हजार पदे भरली जाणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Recruitment 2024) यांनी तरुणांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात 4.11 लाख नोकऱ्याच देण्यात आल्या होत्या. म्हणजेच UPA सरकारच्या तुलनेत रेल्वे भरतीत 25 टक्के वाढ झाल्याचा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अश्वीनी वैष्णव (Railway Recruitment 2024) म्हणाले, 28 डिसेंबर 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत सात टप्प्यांत 726 केंद्रांवर 211 शहरांमधील 1.26 कोटी उमेदवारांसाठी CBT आयोजित करण्यात (Railway Recruitment 2024) आली होती. त्याचप्रमाणे, 17 ऑगस्ट 2022 ते 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत – एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या पाच टप्प्यांमध्ये – 191 शहरे आणि 551 केंद्रांमध्ये 1.1 कोटींहून अधिक उमेदवारांचे CBT द्वारे मूल्यांकन केले गेले. रेल्वे मंत्रालयाने या वर्षी विविध गट ‘क’ पदांसाठी वार्षिक कॅलेंडर सादर करून भरतीचे व्यवस्थापन कसे केले आहे त्यात सुधारणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी लोको पायलट कर्मचाऱ्यांसाठी कामाची परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच ट्रेनच्या ऑपरेशनची सुरक्षा सुधारण्यावरही भर दिल्याचे सांगितलं.

32,603 ​​रिक्त पदे भरली जाणार (Railway Recruitment 2024)
जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत एकूण 32,603 ​​रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या. यामध्ये RPF मध्ये असिस्टंट लोको पायलट, टेक्निशियन, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पदांचा समावेश आहे. RPF कॉन्स्टेबलची भरती प्रक्रिया ही रेल्वे संरक्षण दलात सामील होण्यास उत्सुक असलेल्यांसाठी एक मोठी संधी आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार (CPC), RPF कॉन्स्टेबलचे मूळ वेतन 21,700 रुपयांपासून सुरू होते. तर त्यांचे एकूण वेतन 37,420 रुपये ते 44,460 रुपये असते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com