करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती बोर्डाने RRB ALP CBT 1 (Railway Loco Pilot Recruitment 2024) परीक्षेसंदर्भात अधिकृत वेबसाइटवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार, RRB ALP CBT 1 परीक्षा जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात होईल. CBT 1 नंतर , पुढील टप्पे लवकरच जाहीर केले जातील. RRB ALP परीक्षेसाठी प्रवेशपत्रे नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 7 ते 10 दिवस आधी प्रसिद्ध केली जातील. या परीक्षेच्या तारखा तात्पुरत्या आहेत त्यामुळे नेमकी तारीख तपासण्यासाठी उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेब पोर्टलला भेट द्यावी लागेल.
रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या आधारे केली जाईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात CBT 1 आणि दुसऱ्या टप्प्यात CBT 2 टप्प्याचा समावेश आहे. याशिवाय, तिसऱ्या टप्प्यात संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT) आणि चौथ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी (DV) आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे.
असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ पदासाठी अर्ज केलेल्या (Railway Loco Pilot Recruitment 2024) सर्व पात्र उमेदवारांना सूचित केले जाते की, जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात संगणक आधारित चाचणी (CBT) घेतली जाईल; असे रेल्वे भर्ती बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या सुचना पत्रात म्हटले आहे. CBT च्या वास्तविक तारखा योग्य वेळी सूचित केल्या जातील, उमेदवारांनी वरील गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि GDCE-2023 परीक्षेच्या अपडेट्स आणि माहितीसाठी RRC/SC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे; असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com