Railway Loco Pilot Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार ‘असिस्टंट लोको पायलट’ पदावर मेगाभरती!! 10वी+ITI पास उमेदवार करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी (Railway Loco Pilot Recruitment 2024) निर्माण झाली आहे. जे उमेदवार रेल्वेत नोकरी करु इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत नागपूर विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या 598 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून दिलेल्या पत्यावर उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे.

संस्था – दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरले जाणारे पद – असिस्टंट लोको पायलट
पद संख्या – 598 पदे
भरतीचा तपशील –
UR- 464 पदे
SC- 89 पदे
ST- 45 पदे (Railway Loco Pilot Recruitment 2024)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – South – East Central Railway, Divisional office, Personnel Department, Kingsway, Nagpur, 440001

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – (Railway Loco Pilot Recruitment 2024)
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा – 18 ते 42 वर्षे
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा – 18 वर्षे ते 47 वर्षे
परीक्षा फी – फी नाही

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com